फलटण=श्री.सदगुरू व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले उर्फ भैय्यासाहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन होणार असून सातारा जिल्हा शरीर सौष्ठव संघटना, सातारा व कॅप्टन भोसले हेल्थ क्लब फलटण च्या संयुक्त विद्यमाने “फलटण श्री 2025” भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता महात्मा फुले चौक फलटण येथे केलेले आहे.
सदर स्पर्धेत 50 ते 55 किलो, 55 ते 60 किलो, 60 ते 65 किलो, 65 ते 70 किलो, 70 ते 75 किलो व खुल्या गटाचे स्पर्धकांना प्रवेश मिळू शकणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेची प्रवेश फी रु. शंभर ठेवण्यात आली आहे. सदर स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील बॉडी बिल्डर यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड फलटणचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी केले आहे.