फलटण – सातारा जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी उसाला 3000 च्या वर दर जाहीर केला असताना फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांनी 2800 रुपयांच्या आसपास दर जाहीर करून त्यांच्यातील एकीचा संदेश दिल्याने ऊस उत्पादक संतप्त झाल्याचे वृत्त रक्षक रयतेचा न्यूजने प्रसिद्ध केले होते सदरचे वृत्त शेतकऱ्यांनी उचलून धरून कारखानदारांना धारेवर धरल्याने तालुक्यातील दोन साखर कारखान्यांनी आता 3100 च्या वर दर जाहीर केला आहे.
नीरा खोऱ्यातील आणि शेजारील इतर कारखान्यांच्या ऊस दराबाबतीत फलटण तालुका मागे राहत असल्याने नाराजीचा सुरू होता.फलटण तालुक्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखाना ,लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर स्वराज साखर कारखाना, शरयू साखर कारखाना आणि श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे चार कारखाने असून यातला श्रीराम वगळता इतर सर्व खाजगी कारखाने आहेत.
या कारखान्यांमध्ये खरे तर दराबाबत संघर्ष होणे गरजेचे होते मात्र या चारही साखर कारखान्यांनी सुरुवातीला 2800 रुपयांच्या आसपास दर जाहीर करून ऊस उत्पादकांची कोंडी केली होती. सातारा जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी 3000 च्या वर दर जाहीर केला आहे तसेच फलटण तालुक्यात शेजारी इतर कारखान्यांनी सुद्धा 3000 च्या वर दर जाहीर केला असताना फलटणमध्ये दर कमी दिला जात असल्याने ऊस उत्पादकामध्ये नाराजी व संतप्त भावना पसरत चालली असल्याचे वृत्त रक्षक रयतेचा न्यूजने दि.28 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केले होते. सदरचे वृत्त प्रसिद्ध होतास हे वृत्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उचलून धरून सर्वत्र व्हायरल केले होते. जवळपास 8 हजार 500 लोकांनी हे वृत्त वाचले होते. कारखानदारांसमोर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.
या वृत्ताची दखल घेऊन साखरवाडी येथे दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यांनी तातडीने पहिली उचल 3100 रुपये जाहीर केली होती. त्यानंतर स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लि. उपळवे साखर कारखान्याने 3101 रुपये पहिली उचल जाहीर केली आहे.
रक्षक रयतेचा न्यूजने सर्वात अगोदर फलटण तालुक्यातील ऊसदराबाबत वस्तुस्थिती जाहीर करून ऊसउत्पादकांना जागे केले होते. सदरचे वृत्त ऊस उत्पादकांनी उचलून धरून कारखानदारांना जाब विचारल्याने कारखानदारांनी 3100 दर जाहीर केला .त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वजण रक्षक रयतेचा न्यूजला धन्यवाद देत आहे.आता तालुक्यातील श्रीराम सह.साखर कारखाना आणि शरयू साखर कारखाना काय दर जाहीर करतात याकडे लक्ष लागले आहे.