स्थानिक

फलटण जवळ चालत्या एसटी बसला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

एसटी बस पूर्णपणे जळून खाक

फलटण- फलटण बारामती रस्त्यावर दौंड बारामती कोल्हापूर या एसटी बसला अचानक आग लागून बस पूर्णपणे खाक झाली आहे . सुदैवाने प्रवाशांना चालक वाहकाने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बाहेर काढल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

याबाबतचे अधिक माहिती अशी की बारामती वरून कोल्हापूरकडे बारामती डेपोची बस दुपारी 2.30 च्या सुमारास निघालेली होती. फलटण शहराच्या अलीकडे अचानक बसच्या बोनेटमध्ये आग लागली आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन प्रवाशांना बाहेर उतरण्यास सांगितले. मोटरसायकल वरून जाणारे सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पोतेकर व अतुल मोहोळकर यांनी बसला आग लागल्याचे दिसताच तेथे धाव घेतली चालक व वाहक यांच्या सोबतीने त्यांनी पण प्रवाशांना बाहेर काढून बाजूला नेले. तसेच पोतेकर यांनी फलटण शहर पोलीस ठाणे व अग्निशामन दलाला माहिती दिली. हा हा म्हणता पूर्ण पणे बसला आग लागली सुदैवाने सर्व प्रवासी बस मधून बाहेर पडलेले होते काही जणांचे बस मध्ये सामान राहिले ते जळाले. बसने पूर्णपणे पेट घेतला असताना फलटणच्या अग्निशामन ची गाडी तेथे आली मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळालेली होती. घटनास्थळी फलटण व बारामतीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या बसला कशामुळे आग लागली हे समजू शकलेले नाही प्रवाशांचा जीव वाचल्याने सर्वांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे. चालक व वाहकांना मदत करणाऱ्या मोहनराव पोतेकर व अतुल मोहोळकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button