फलटण -फलटणमधील गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणारे फलटणमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त 31 डिसेंबर 2024 रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेले आहे याचा लाभ फलटण तालुक्यातील नागरिकांनी घेण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

अमीरभाई शेख यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते पाच या दरम्यान बारवबाग, लक्ष्मी नगर येथे मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच मोतीबिंदू ऑपरेशन साठी जे पात्र ठरतील त्यांच्यावर मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण वृद्धाश्रम व मदरशात फळे वाटप करण्यात येणार आहे.

Back to top button
